सन २०२४ गणेशोत्सव काळात ज्या मंडळानी आदर्श असा गणेशोत्सव साजरा केला त्या पैकी निवड समितीने प्रथम तीन क्रमांकात आलेल्या मंडळांचा सत्कार धनंजय पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
येऊ घातलेल्या गणेशोत्सव काळात सर्व गणेश मंडळानी कायद्याचे तंतोतंत पालन करावे,सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या गावाचा व आपल्या मंडळाचा नाव लौकिक वाढवावा मात्र कोणी कायद्याचे उल्लंघन करून गैरकृत्य केल्यास कठोर पोलिस कारवाई केली जाईल असा इशारा दि. १३ ऑगस्ट रोजी ओतूर येथील क्रीडा संकुलन सभागृह येथे आयोजित गणेश मंडळांच्या पदाधिकारी व पोलिस बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी दिला आहे…
तत्पूर्वी सन २०२४ गणेशोत्सव काळात ज्या मंडळानी आदर्श असा गणेशोत्सव साजरा केला त्या पैकी निवड समितीने प्रथम तीन क्रमांकात आलेल्या मंडळांचा सत्कार धनंजय पाटील यांचे हस्ते करण्यात आला. त्यामध्ये
1)जय बजरंग प्रतिष्ठान पांढरीचा राजा ओतूर
2)अखील कृषी उत्पन्न बाजार समिती ओतूर
3)सार्वजनिक गणेश उत्सव मडळ हिवरे बुद्रुक अशी या आदर्श कार्य करणाऱ्या मंडळांची नावे आहेत.
या प्रसंगी
जय बजरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल डुंबरे, सचिव हेमंत पाटील डुंबरे,दत्तात्रय डुंबरे, कैलास बोडके,सिद्धेश तांबे,आदर्श गणेशोत्सव मंडळ निवड समितीचे परीक्षक पत्रकार बापू रसाळे,आदर्श शिक्षिका रत्ना शिरसाठ, अँड संजय शेटे,डॉ.संजय वेताळ,मंत्रालय निवृत्त अधिकारी दिलीप घोलप, यासह ओतूर पोलीस स्टेशनचे ए पी आय लहू थाटे ,पो.निरीक्षक संदीप आमने, ओतूर पोलिस कर्मचारी ,ज्येष्ठ नेते विनायक तांबे, शेतकरी नेते अंबादास हांडे,उपसरपंच प्रशांत डुंबरे, गावोगावचे पोलिस पाटील,विविध मंडळांचे पदाधिकारी ओतूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी २०२५ च्या गणेशोत्सव काळात मंडळानी कोणती खबरदारी घ्यावी याविषयी कायदेशीर नियमावली जाहीर केली ती पुढील प्रमाणे –
1)रजिस्टर नसलेल्या गणपती मंडळांनी धर्मदाय आयुक्त यांचे कडुन तात्पुरता परवाना घेणे जरूरीचे आहे.
2)पोलीस विभाग ,नगरपालीका /ग्रामपंचायत ,महावितरण ,यांची परवानगी प्राप्त करावी .
3)दिवसा व रात्रीचे वेळी मुर्तीचे संरक्षण तसेच मुर्तीचे दागिन्यांचे संरक्षण या करीता आपले मंडळाचे वतीने स्वयंसेवक सुरक्षा रक्षक नेमणे,त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या मंडळाची असेल.
4) मंडपामध्ये किंवा गणपतीचे मुर्तीचे ठिकाणी करण्यात येणारी वीज जोडणी/करण्यात येणारी विद्युत रोषणाई सुरक्षित असले बाबत एम.एस.ई.बी.कार्यालयातील संबधित कर्मचा-यांकडून तपासणी मंडळानी तसे प्रमाणपत्र घ्यावे.
5) प्रत्येक मंडळाने आपले अध्यक्ष,उपाध्यक्ष व पदाधिकारी यांचे संपूर्ण,नाव, पत्ता, मोबाईल नंबरची यादी मंडळा समोर दर्शनी भागात लावावी.
6) गणपतीच्या मुर्तीच्या संरक्षणाकरिता 24 तास स्वयंसेवक नेमावेत.
7) गणेश मंडपात आग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. CCTV कॅमेरे लावावे.
8) मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनीक्षेपकावर दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात यावे. लेझर लाईट चा वापर कोणीही करू नये असे निदर्षनास आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल.
9) महिला आणि लहान मुलांकरिता स्वतंत्र रांगा करावेत व छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी.
10) गणेशोत्सवात दर्शविण्यात येणारे देखावे/चित्रे हे चिथावणारे अथवा जातीयवादी नसावेत.
11) मिरवणूक जास्त वेळ एका ठिकाणी रेंगाळत ठेवू नये. वाद निर्माण होतील असे गीत वाजवू नयेत. नशा पाणी करून कोणीही मिरवणुकीत सामील होऊ नये.
12)जाणीवपुर्वक, खोडसळपणे मिरवणूकीत घुसण्याचा प्रयत्न करणायांवर मंडळाचे अध्यक्ष व सभासद यांनी सदर इसमाशी वाद न घालता सदर इसमास तात्काळ पोलीसांकडे सुपूर्त करावे.
13)जात ,धर्म ,पंथ,व्यक्ती ,समाज यांच्या भावना दुखवतील /ठेच पोहचेल असे फ्लेक्स देखावे ,कृत्य, नृत्य संगीत होणार नाहीत याची दक्षता खबरदारी घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या प्रकारच्या सूचना यावेळी देण्यात आल्या, रत्ना शिरसाठ, बापू रसाळे, विनायक तांबे यांनी उपस्थितांना संबोधित करून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.