Facebook Instagram Down Breaking :फेसबुक, इन्स्टाग्रॅम जगभरात डाऊन, फेसबुकवरून युजर्स आपोआप लॉग-आऊट


फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरणाऱ्या नेटीझन्सचा मोठा हिरमोड झाला आहे. कारण फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक बंद पडलं आहे. फेसबुक तर लॉगिनही होत नाहीय. तर इन्स्टाग्रामही निपचित आणि थंड पडलं आहे.

5 मार्च 2024: फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरणाऱ्या नेटीझन्सचा मोठा हिरमोड झाला आहे. कारण फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक बंद पडलं आहे. फेसबुकचं तर लॉगिनही होत नाहीय. तर इन्स्टाग्रामही निपचित आणि थंड पडलं आहे. पोस्ट, कमेंट करता येणं बंद झालं आहे. तसेच नवीन स्टोरी लोड होणं बंद झालं आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे संबंधित बाधा निर्माण झाली आहे. दुसरीकडे ट्विटरवर फेसबुक डाऊन आणि इन्स्टाग्राम डाऊन असा टॉपिक ट्रेंडिंगवर आला आहे. विशेष म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने जगभरातील लाखो चाहत्यांचं कोट्यवधींचं नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. या तांत्रिक बिघाडाबद्दल सध्या कंपनीकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. चाहते अतिशय आतुरतेने फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा सुरु होण्याची वाट बघत आहेत.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन्ही सोशल मीडिया अ‍ॅप प्रचंड लोकप्रिय आहेत. दररोज इथे कोट्यवधी युजर्स वेगवेगळी पोस्ट करत असतात. या प्लॅटफॉर्मवर कुणी आपली कला सादर करत असतं, कुणी आपल्या भावनांना वाट करुन देत असतं, कुणी मैत्री शोधत असतं, कुणी प्रेम शोधत असतं, कुणी बिझनेस करतं, तर कुणी सामाजिक उपक्रम राबवतं. प्रत्येकासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे महत्त्वपूर्ण होतं. या दोन्ही अ‍ॅपशिवाय युजर्सचा वेळ जाणं कठीण आहे. विशेष म्हणजे जगभरातील कानाकोपऱ्यातील कुठलेही मित्र या अ‍ॅप्समुळे जवळ आले आहेत. तर अनेकांचं उत्पन्नाचं महत्त्वाचे माध्यम हे अ‍ॅप्स बनले आहेत. त्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा त्यांना मोठा फटका देखील बसण्याची शक्यता आहे.

Advertisement

ट्विटरवर मजेशीर ट्विट्सचा अक्षरश: पाऊस

फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर ट्विट्सचा अक्षरश: पाऊस पडताना दिसतोय. युजर्स याबाबत मजेशीर ट्वीट करत आहेत. फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्ग पत्नीसह उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या लग्नात एन्जॉय करतोय. तर तिकडे फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन झालंय, असं मजेशीर ट्विट एका युजरने केलं आहे. तर काहींनी फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्यावर युजर किती वेगाने ट्विटरवर चेक करायला येतात, याबाबतचे वेगवेगळे आणि मजेशीर ट्विट केले आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »