बुधवारी, पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTO) पुणे आणि पिंपरी-चिंचवड विभागांसाठी टॅक्सी भाड्यात सुमारे 20-25% वाढ करण्याची घोषणा केली. गेल्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात टॅक्सी चालकांच्या आंदोलनादरम्यान मागण्या मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
खटुआ समितीच्या सूचनेनुसार भाडे संरचनेत सुधारणा करण्यात आली. Ola आणि Uber सारख्या अॅप आधारित राइड-हेलिंग कंपन्या देखील निर्धारित भाडे दर लागू करण्यास बांधील आहेत. त्याचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास कॅब चालकांकडून या कंपन्यांविरुद्ध आंदोलन केले जाऊ शकते.
- आरटीओने टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी परवानगी दिली आहे.
A.C कारच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने(RTO) ने घेतलाय.
येथून पुढे पुण्यात A.C कार ने प्रवास करण्यासाठी पहिल्या 1.5 K.M (दीड की.मी) साठी ₹37 आणि पुढच्या प्रत्येक कि. मी साठी ₹25 आकारले जातील.
तर NON-AC टॅक्सी च्या दरामध्ये कोणतीही वाढ नाहीये.