PM Modi Launches 4G Network : पंतप्रधान मोदींकडून BSNL चं स्वदेशी 4G नेटवर्क लोकार्पण; देशभरात 98 हजार टॉवर्स सुरू


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या पहिल्या ‘स्वदेशी’ 4G स्टॅकचं उद्घाटन केलं. हा क्षण भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या सोबतच BSNL च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मोदींनी देशभरात 97,500 हून अधिक मोबाईल टॉवर्स राष्ट्राला समर्पित केले. यामुळे भारताच्या स्वावलंबी डिजिटल पायाभूत सुविधांना नवा वेग मिळणार आहे.

या 4G साइट्समध्ये BSNL चे तब्बल 92,600 हून अधिक टॉवर्स समाविष्ट असून, सुमारे 37 हजार रुपये कोटींच्या खर्चातून स्वदेशी तंत्रज्ञान वापरून उभारले गेले आहेत. क्लाउड-आधारित या प्रणालीमुळे भविष्यात 5G मध्ये सहज अपग्रेड करण्याची क्षमता उपलब्ध राहणार आहे. यामुळे भारत चीन, डेन्मार्क, दक्षिण कोरिया आणि स्वीडन यांसारख्या स्वदेशी दूरसंचार उपकरण तयार करणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.

Advertisement

ही सुरुवात “डिजिटल इंडिया” या सरकारी मिशनशी सुसंगत ठरणारी मोठी पायरी मानली जाते. अधिकृत निवेदनानुसार, या नेटवर्कमुळे ग्रामीण आणि सीमेवरील भागांना वेगवान संपर्क मिळणार असून, BSNL च्या 5G विस्तारासाठीही मार्ग मोकळा होईल.

महत्त्वाचे म्हणजे, या प्रकल्पामुळे 26,700 हून अधिक दुर्गम आणि आतापर्यंत संपर्कविहीन खेड्यांना मोबाईल नेटवर्कशी जोडले जाणार आहे. यामध्ये फक्त ओडिशातीलच 2,472 गावे समाविष्ट आहेत. यामुळे तब्बल 20 लाख नवीन ग्राहकांना सेवा उपलब्ध होणार आहे. या टॉवर्सपैकी बरेच टॉवर्स सौर ऊर्जेवर चालणार असून, हे भारतातील सर्वात मोठे हरित दूरसंचार क्लस्टर ठरणार आहे.

याचबरोबर पंतप्रधानांनी “100 टक्के 4G सॅच्युरेशन” उपक्रमालाही प्रारंभ केला. डिजिटल भारत निधीअंतर्गत सुमारे 29,000–30,000 गावांना मिशन मोडवर मोबाईल नेटवर्कशी जोडले जाणार आहे. स्वदेशी 4G स्टॅकच्या उद्घाटनासह भारताने तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वावलंबनाकडे आणि डिजिटल समावेशकतेकडे एक महत्वाचे पाऊल टाकलं आहे.


Translate »
error: Content is protected !!