नोबेल विजेते डॉ.मुहम्मद युनूस यांना ६ महिन्यांचा तुरुंगवास!!!

बांगलादेशचे नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मुहम्मद युनूस यांना सोमवारी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
काय कारण?
कामगार कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी बांगलादेशचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. मुहम्मद युनूस यांना न्यायालयाने सोमवारी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

डॉ. मुहम्मद युनूस यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्याचे नमूद करून कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश शेख मरिना सुलताना यांनी युनूस यांना सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात येत असल्याचे जाहीर केले. ‘ग्रामीण टेलिकॉम’चे अध्यक्ष म्हणून डॉ. युनूस यांच्यासोबत कंपनीच्या अन्य तीन पदाधिकाऱ्यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. या चौघांना प्रत्येकी २५ हजार टका ($227.82) इतका दंडही ठोठावण्यात आला असून, तो न भरल्यास आणखी दहा दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Advertisement

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर डॉ. युनूस यांच्यासह अन्य तिघांनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने प्रत्येकी पाच हजारांच्या वैयक्तिक हमीवर त्यांना महिनाभराचा जामीन मंजूर केला. आता त्यांना शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देता येणार आहे. बांगलादेशातील गरीबकेंद्री सुक्ष्म वित्तपुरवठा क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या डॉ. युनूस यांनी ‘ग्रामीण टेलिकॉम’ ही कंपनी स्थापन केली होती. त्यात त्यांनी ‘कामगार कल्याणनिधी’च्या नियमाचे पालन केले नसल्याचा आरोप होता.

डॉ. युनूस यांनी द्रारिद्र्य निर्मूलन मोहिमेअंतर्गत ‘ग्रामीण बँके’चा अभूतपूर्व प्रयोग राबवला. ‘ग्रामीण बँके’चे हे प्रारूप अनेक देशांनी स्वीकारले. या कामगिरीबद्दल डॉ. युनूस यांना सन २००६मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते…

 -Neha Pardeshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!