आपण डिजिटल फ्रॉडचा सामना केला? मदतीसाठी १९३० नंबर करा डायल!


भारतातील डिजिटल युगाच्या प्रवासात, बँकिंग आणि आर्थिक व्यवहार सोपे झाले आहेत, परंतु त्याचबरोबर डिजिटल फ्रॉडचे प्रमाणही वाढले आहे. स्कॅम आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, अनेक लोक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत.

भारत देश सध्या डिजिटल युगाकडे वाटचाल करत आहे. सध्याच्या काळात बँक आणि संबंधित कामे घरबसल्या होतात. त्यासाठी कार्यालयीन चकरा यामुळे कमी झाल्या आहेत. आता आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण घरबसल्या मेसेज किंवा पैसे पाठवू शकता. अशा प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे लोकांना सेवा दिल्या आहेत.

डिजिटल फ्रॉडचे वाढत चालले प्रमाण –

Advertisement

डिजिटल फ्रॉडचे प्रमाण वाढत चालले असून स्कॅम आणि आणि फ्रॉड फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. या अशा घटनांमुळे अनेक लोकांच्या खात्यामधून पैसे काढण्यात आल्याची घटना घडत आहे. सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याबाबतची जागरूकता सुरु करण्यात आली असून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँक याबाबतची जागरूकता करत आहे.

फसवणूक झाल्यावर ‘या’ नंबरवरून मिळणार मदत – 

 ग्रामीण भागात अशा प्रकारची फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या मोबाईलवर ओटीपी आला आहे असे म्हणून अनेक सामान्य लोकांची फसवणूक केली जाते. सामान्य लोकांना यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो. फसवणूक झाल्यावर आपण १९३०  हा क्रमांक डायल केल्यावर सामान्य लोकांची ताबोडतोब मदत केली जाणार आहे.

– Vishal Patil.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!