WhatsApp ने देशातील वापरकर्त्यांवर मोठी कारवाई केली आहे, ऑक्टोंबर महिन्यात भारतातील 23 लाख पेक्षा जास्त अकाउंटवर कारवाई केली आहे. देशात नव्या आयटी नियमा आधारीत ही कारवाई करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान, 23,24,000 Whatsapp अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली होती, आणि त्यापैकी 8,11,000 अकाउंट कायमचे बंद करण्यात आली आहेत.
WhatsApp जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग ॲप आहे. Whatsapp नेहमी नवे बदल करत असते. गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियासाठी नवीन नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
WhatsApp ला ऑक्टोबरमध्ये भारतात 701 तक्रारी मिळाल्या होत्या, यापैकी 34 तक्रारींच्या नोंदी होत्या. आयटी नियम 2021 नुसार, ऑक्टोबर 2022 महिन्यासाठी Whatsapp ने अहवाल प्रकाशित केला आहे. यानुसार ऑक्टोबर महिन्यात 2.3 मिलियन पेक्षा जास्त अकाउंटवर बंदी घातली.
Whatsapp ने सप्टेंबर महिन्यातही ही कारवाई केली होती. सप्टेंबर महिन्यात 26.85 लाखपेक्षा अधिक अकाउंटवर बंदी घालण्यात आली होती. तसेच कंपनीने ऑगस्ट महिन्यात 23.28 लाखपेक्षा अधिक अकाउंटवर बंदी घातली.
नव्या आयटी नियमानुसार 5 मिलियन पेक्षा जास्त वापरकर्ते असलेल्या प्रमुख डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मंना महिन्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. दरम्यान, खुल्या, सुरक्षित, विश्वासार्ह इंटरनेटच्या दिशेने वाटचाल करताना, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ‘डिजिटल नागरिकांच्या’ अधिकारांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने काही सुधारणा अधिसूचित केल्या आहेत.