उजनी धरणातील वाळु चोरी प्रकरणातील आरोपी पंडित मधुकर महाडिक यांनी आपल्या मालट्रक नंबर MH 45/0518 मध्ये उजनी जलाशयातील 03 ब्रास वाळू त्याची किंमत अंदाजे 30.000/रु ची अवैधरित्या, शासनाची कोणती हि परवानगी न घेता तसेच रॉयल्टी न भरता वाहतूक करून घेवुन जात असताना मिळून आले म्हणुन त्याचा विरुद्ध भारतीय दंड सहिता कलम 379 व पर्यावरण अधिनियम कलम 15 प्रमाणे फिर्याद स्वप्निल सोनटक्के (तलाठी) यानी टेंभुर्णी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 252/2019 द्वारे गुन्हा नोंद केला होता. या मध्ये तपासी अधिकारी म्हणून गूटाळ यांनी काम पाहिले होते.
प्रस्तुत प्रकरणात 05/08/2024 रोजी आरोपीवर दोषारोप ठेवण्यात आले होते. अभियोग पक्षाच्या वतीने 4 साक्षीदार तपासण्यात आले होते, आरोपीच्या वकिलांचा अंतिंम युक्तिवाद ग्राह्य धरून व अभियोग पक्ष दोषाआरोप सर्व संशया पलीकडे सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. संपूर्ण प्रकरण हे मा. पिठासिन अधिकारी न्यायाधीश जी.व्ही.गांधे साहेब याच्या कोर्टात चालले.
आरोपी पंडित महाडिक याच्या वतीने ॲड. रणजित हरिदास पाटील यानी काम पाहिले.