दूधाला प्रतिलिटर 5 रुपयांचं अनुदान ; दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार लाभ !!


दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. दुधासाठी सरकार 5 रुपयांचं अनुदान देणार आहे. त्यामुळं पाच रुपयांच्या सबसिडीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना 32 रुपयांचा दर मिळणार आहे. 32 रुपयाचा दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना 27 रुपये प्रति लिटर दर द्यावा लागणार आहे.

नागपूर अधिवेशनात घोषणा

राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात याबाबतची घोषणा केली होती. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. दरम्यान, आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 72 टक्के दूध खासगी संस्थांना दिले जाते आणि सरकारनं दिलेलं अनुदान फक्त सहकाराला आहे. त्यामुळं बहुतांश दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार आहेत. त्यामुळं सरकारनं सर्वांना अनुदान द्यावं, अशी मागणी किसान सभेनं केली होती.

Advertisement

दरम्यान, डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. ही योजना दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागु राहणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेवून मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. ही योजना आयुक्त (दुग्धव्यवसाय विकास) यांच्या मार्फत राबविली जाणार आहे.

-Vishal Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »