मुंबईत आंदोलन करणारच….! मनोज जरांगे पाटील यांचे ठाम मत..


मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या खूप चर्चेत आहे.मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी लढत आहेत. 20 जानेवारी पासून मनोज जरांगे हे मागे हटायचं नाही हि भूमिका साकारणार आहेत.मराठा आरक्षणासाठी जरांगे हे आता मुंबईत आंदोलन करणार आहेत.सुरवातीला मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्णया साठी वेळ दिला होता,पण मात्र सरकारने या बाबत काही निर्णय घेतले नाही.
मुंबईत आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे यांनी मैदानासाठी मागणी केली आहे. शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्या आंदोलना साठी परवानगी मागितली आहे, व शिष्टमंडळाने तिन्ही मैदानांसाठी तीन दिवसा पूर्वीच परवानगी मागितली होती.मुंबई पोलिसांकडे मनोज जरांगे यांचा शिष्ठमंडळाने आंदोलनाचा परवानगी साठी पत्र व्यवहार केलं आहे.आंदोलनाला काहीच दिवस शिल्लक असल्याने मुंबईतील सकळ मराठा समाजाचे समन्वयक हे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी जालन्यात गेले होते.जरांगे पाटील यांनी मुंबईतल्या सर्व समन्वयकांना आंदोलनाची तयारी करण्याची सूचना केली आहे

Advertisement

मनोज जरांगे यांचं मत काय?

आंदोलनाचा दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मराठ्यां कडून व इतर लोकांकडून मिळत आहे.
एक मराठा लाख मराठा झाले आहेत.
20 जानेवारी पर्यंत सरकारला चर्चे साठी दारं खुली आहेत.20 तारखे पर्यंत सरकारला आरक्षण द्यावाच लागणार असे जरांगे यांचं म्हणणं आहे. जरांगे पाटील या मुंबई दौऱ्याच्या माध्यमातून मराठा समाजाला मुंबईतल्या मोर्चा मध्ये आवाहन करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »