माढा तालुक्यातील युवक उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या कार्य कर्तृत्वावर तसेच माढयाचे आमदार मा. बबनदादा शिंदे साहेब आणि करमाळयाचे आमदार मा. संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काम करत आहेत. या युवकांचा पदनियुक्ती समारंभ संपन्न झाला. यामध्ये माढा तालुकाध्यक्ष पदी संभाजी बबनबापू पाटील, कार्याध्यक्ष पदी रामराजे नलवडे, माढा शहराध्यक्ष पदी अनिकेत चौवरे, कार्याध्यक्ष रणजित देवकुळे, मोडनिंब शहराध्यक्ष पदी विक्रांत शिंदे, कार्याध्यक्ष राजकुमार पाटील, टेंभुर्णी शहराध्यक्ष मंगेश देशमुख, कार्याध्यक्ष पदी तानाजी लोंढे यांची निवड झाली. या निवडीचे पत्र देत मा.श्री रणजीत(भैय्यासाहेब)शिंदे ( चेअरमन : जिल्हा दूध संघ / सदस्य : जिल्हा परिषद, सोलापूर) यांनी सर्वांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
पदाधिकाऱ्यांनी काम करत असताना आपल्या पदाला योग्य तो न्याय देऊन जनसामान्य, गोर-गरीबांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी तुम्हाला मदत लागेल त्या ठिकाणी मी स्वतः तुमच्या सोबत उभा राहील. असा विश्वास यावेळी मा.श्री रणजीत(भैय्यासाहेब) शिंदे यांनी दिला. यावेळी सोलापूर युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, मा. जि. प. सदस्य झुंझार (नाना) भांगे, माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.