I&B Ministry Cancels Lokshahi Channels License: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘लोकशाही मराठी’ या मराठी वृत्तवाहिनीचा परवाना मंगळवारी 30 दिवसांसाठी निलंबित केला. मंत्रालयाने नोटीस देऊन लोकशाही मराठीचे मंगळवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून पुढील 30 दिवसांसाठी प्रक्षेपण बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी 14 जुलै 2023 रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओचे वृत्त दिल्यानंतर ही वाहिनी सरकारी स्कॅनरखाली आल्याचा आरोप वृत्तवाहिनीने केला आहे.
वृत्तवाहिनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “14 जुलै 2023 रोजी आम्ही एक बातमी दाखवली होती. आम्हाला 72 तास चॅनेल बंद करण्याची नोटीस आली होती. यानंतर दिल्ली हायकोर्टात याविरोधात आम्ही अपील केले होते. त्यानंतर आमच्यावरील बंदी काढून घेतली होती. पण, आता पुन्हा एकदा लोकशाही मराठीचं लायन्सस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असे लोकशाही मराठीकडून सांगण्यात आले आहे.
‘कायदेशीर लढाईसाठी सज्ज’ – “लोकशाही मराठीने एक भूमिका मांडली. स्पष्टपणे, निर्भिडपणे पत्रकारीता करण्याचे काम केले. या 26 जानेवारी रोजी आम्ही चौथा वर्धापन दिन साजरा करणार होतो. पण, गेले काही दिवस वारंवार माहिती आणि प्रसारण मंत्रालय खात्याकडून नोटीस देण्यात येत होत्या. 14 जुलै 2023 रोजी एक बातमी दाखवली होती. आम्हाला 72 तास चॅनेल बंद करण्याची नोटीस आली होती. यानंतर दिल्ली हायकोर्टात याविरोधात आम्ही अपील केले होते. यानंतर आमच्यावरील बंदी काढून घेतली होती. पण, आता पुन्हा एकदा लोकशाही मराठीचं लायन्सस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार महिन्यांपूर्वी प्रसारण खात्याने आमच्याकडून माहिती मागवली नव्हती. अचानकपणे वेगवेगळी माहिती मागविण्यात आली. यामध्ये लायन्ससबाबत प्रश्न उपस्थित करत लोकशाही मराठी बंद करण्याचे काही मिनिटांपूर्वी आदेश दिले आहेत. न्यायालयीन लढाई आम्ही लढूच”, असे लोकशाही चॅनलच्या निवेदनात म्हटले आहे.