PM-KISAN Scheme Amount Budget 2024
यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावरही सरकारचा भर आहे. सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणारी रक्कम वाढविण्याचा विचार करत आहे.
सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणारी रक्कम वाढविण्याचा विचार करत आहे. लवकरच प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपयांऐवजी 8,000 रुपये वार्षिक मिळू शकतात.
सरकार अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांना अतिरिक्त मदत देण्याचा विचार करत आहे. माहितीनुसार, सरकारी विभाग एमएसएमईसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उद्देशाने योजना तयार करत आहेत. असे वृत्त CNBC-TV18ने दिले आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता केंद्र सरकारने गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी जारी केला होता. सरकारने आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. आता शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील म्हणजेच 16 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.