ऑन ड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलल्याने कांबळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बंडगार्डन पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ससून रुग्णालयात तृतीयपंथीय करिता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे तर त्या वॉर्ड चे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते काल 5 जानेवारी रोजी झाले. या वेळी मंत्री हसन मुश्रीफ,महिला आयोगाचा अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, आमदार सुनील कांबळे,आमदार रवींद्र धंगेकर, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता विनायक काळे व बाकी अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या कोनशिलेवर आमदार सुनील कांबळे यांचा नाव नसल्याने ते नाराज होते कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सुद्धा सुनील कांबळे यांचा वाद तिथल्या एका कर्मचारी सोबत झाला होता. कार्यक्रम संपल्यानंतर कांबळे व्यासपीठावरून खाली उतरत होते. त्यावेळी साध्या वेशातील पोलिसाच्या गालावर त्यांनी मारले. दरम्यान, सभागृहातून बाहेर पडताच कांबळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशीही वाद घातला. ससून रुग्णालय ज्या भागात आहे तेथील स्थानिक आमदार असूनही माझे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्या वेळी डॉ. देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झालेल्या पत्रव्यवहाराची प्रती मोबाईलवर दाखविल्या. त्यामुळे नावाबाबतची चूक आपल्या कार्यालयातून झाली नसल्याचे त्यांनी त्याच वेळी स्पष्ट केले.
सोशल मीडिया वर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ ने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून लावली होती. विरोधकांनी देखील भाजप आणि सरकार विरोधात टिप्पणी केली होती. रात्री अखेर या पोलीस काँन्स्टेबल शिवाजी सरक यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.