शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! वैयक्तिक शेततळे अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ – असा करा अर्ज


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यामध्ये वैयक्तिक शेततळे अनुदान योजनेचा देखील समावेश आहे. खरं पाहता ही योजना कोरोना काळात बंद होती. मात्र आता ही योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे आता या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात मोठी वाढ झाली आहे. अनुदान जवळपास 50 टक्क्यांनी वाढले आहे. पूर्वी जे अनुदान 50 हजार एवढं होतं ते अनुदान आता 75 हजार रुपये एवढा करण्यात आल आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत आता तालुका निहाय शेततळे अनुदानासाठी उद्दिष्टे ठरवण्यात आले आहे.

📃 आवश्यक कागदपत्रे

▪ शेत जमिनीचा सात-बारा आणि ८-अ उतारा

▪ आधारकार्ड झेरॉक्स

▪ बँक पासबुक झेरॉक्स

▪ हमीपत्र आणि जातीचा दाखला

असा करावा लागणार बरं अर्ज

Advertisement
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांना http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. महाडीबीटी पोर्टल वर गेल्यानंतर त्यां ठिकाणी शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. या करिता ‘सिंचन साधने व सुविधा’ या टाईल अंतर्गत ‘वैयक्तिक शेततळे’ निवडावे, यानंतर ‘इनलेट व आउटलेट सह’ अथवा ‘इनलेट व आउटलेट विरहित’ यापैकी एक उपघटक निवडावा लागणार आहे.

त्यानंतर शेततळे आकारमान व स्लोप निवडायचा आहे. याप्रमाणे ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर सदर लाभार्थी शेतकरी महा-डीबीटी पोर्टलवर सोडतीद्वारे निवडीची कार्यवाही करण्यात येईल. या योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडे 0.60 हेक्टर शेत जमीन असणे अनिवार्य आहे. याशिवाय सदर शेतकऱ्याकडे शेततळे तयार करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य जमीन असणे देखील अनिवार्य आहे.

विशेष म्हणजे याआधी संबंधित शेतकऱ्यांनी कोणत्याही शासकीय योजनेच्या माध्यमातून शेततळे अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. सामूहिक शेततळे योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेतलेले शेतकरी देखील यासाठी पात्र राहणार नाही त्याची दखल घ्यावी. निश्चितच अनुदानात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

-Vishal Patil.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!