कन्हेरगाव तालुका माढा येथील युवा नेते ऋतुराज तानाजी काळे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत इंदापूर येथील मूक बधीर व दिव्यांग मुलांना फळे वाटप व अल्पोपहार देण्यात आला. वाढदिवसानिमित्त इतर खर्च न करता आपला वाढदिवस लहान मुलांबरोबर साजरा केल्याने एक आदर्श निर्माण केला आहे….
युवा नेते, ऋतुराज काळे पाटील यांना अगदी लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड असून त्यांनी आपला वाढदिवस इंदापुर येथील मूक बधीर व दिव्यांग लहान मुलांबरोबर साजरा करून एक तरुण युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. यावेळी मुख्याध्यापक अमूल उन्हाळे व सर्वो शिक्षण स्टाफ उपस्थित होता… प्रवीण भैया करे, तन्मय महाडिक, ओंकार यादव, अरुण पाटील, रामभाऊ सलगर, शिवाजी वाघमोडे, विशाल नरळे, संदिप लवटे, नागनाथ भानवसे, पृथ्वीराज मकर, बाळु पाटील, गौरव घोडके, मयूर गावडे, बालाजी खरात, शुभम जाधव आदी उपस्थित होते…!!