आपटा गावातील दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा…!


जिल्हा रायगड मधील पनवेल तालुक्यातील आपटा गावातील दहीहंडी उत्सव यंदा विशेष उत्साहाने साजरा करण्यात आला. संपूर्ण गावात उत्सवाची धामधूम आणि आनंदाचे वातावरण होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच गावकऱ्यांनी या उत्सवात सक्रिय सहभाग घेतला. गावातील राधा कृष्ण चे मंदिर सजावटीने नटले होते, ज्यामुळे या उत्सवाचे विशेष आकर्षण वाढले.

गावातील मंडळी विविध पारंपरिक खेळ व नृत्य आणि कार्यक्रमांमध्ये गुंतलेली होती. प्रत्येक घरातून उत्सवाचा आनंद आणि सणासुदीची चाहूल जाणवत होती. दहीहंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे ती फोडण्याचे सोहळे. या वर्षीच्या दहीहंडी उत्सवासाठी गावातील तरुणांनी खास तयारी केली होती. त्यांनी एकत्र येऊन या सोहळ्यासाठी विविध प्रकारचे पारंपरिक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

Advertisement

गावातील गवळणींचे विशेष करून पारंपरिक वेशभूषेत सजून या सोहळ्यात आपली उपस्थिती लावली. काहींनी गीत, नृत्य, सादर करून वातावरणात रंग भरले. याशिवाय, गावातील ज्येष्ठ मंडळींनीही भजन व नृत्य करून शोभा वाढवली

या वर्षीच्या दहीहंडी उत्सवाने आपटे गावातील एकोप्याची आणि सांस्कृतिक परंपरेची महत्त्वाची ओळख नव्या पिढीला दिली. सणाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन साजरे केलेला हा सोहळा गावकऱ्यांच्या मनात आनंदाच्या आठवणी कायम ठेवणारा ठरला.

– Vidhi Pramod Mehetar


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!