इराणमध्ये आज मोठी महाभयानक घटना घडली.
इराणचे रिव्होल्युशनली गार्ड्सचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या केरमन शहरातल्या कबरी जवळ 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर दोन मोठे बॉम्ब स्फोट झाले.
अमेरिकाच्या ड्रोन हल्ल्या मध्ये कासिम सुलेमानी यांना ठार मारण्यात आले होते. त्यांचा आज चौथा पुण्यस्मरण दिवस होता या दोन हल्ल्या मध्ये जवळपास 103 लोकांची जीवितहानी झाली तर जखमींचा आकडा 170 वर जवळपास पोहोचला आहे.त्यांच्या कबरी जवळ शेकडो लोक जमली होती बॉम्ब स्फोट झाल्या नंतर जीव वाचवण्या साठी लोकांची पळापळ व चेंगराचेंगरी झाली,ह्या मध्ये जखमींचा आकडा अजून वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.
इराण मधील केरमन चे राज्यपाल यांचा म्हणनं असं आहे की हा पुर्णपणे नियोजित दहशतवादी हल्ला आहे,व इराण चे म्हणनं आहे की ह्या बॉम्ब स्फोटचे जिम्मेदार यूएस आणि इस्राएल आहे.
ह्या हल्ल्याची बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली आहे.
या घटने मुळे इराण मधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे