रायगड जिल्हा येथील रोहा तालुक्यातील रोहा गौळवाडी येथे युवा दिन म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने गावातील ग्रामस्थांनी व श्री स्वामी विवेकानंद संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्र येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन गावामध्ये आयोजित केले गेले.या शिबिरामध्ये रोहा गौळवाडी ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. समाजाची व काळाची गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले.कार्यक्रमाची सुरुवातच फार चांगल्या रीतीने पार पडली. राधा कृष्ण यांचा मूर्तीस हार घालून पूजन करण्यात आले व श्री स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून या सुंदर व अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची सर्वात करण्यात आली.
या रक्तदान शिबिरासाठी स्वामी विवेकानंद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख श्री रुळेकर साहेब व त्यांचे सहकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोसावी व त्यांचे सहकारी तसेच श्री राधाकृष्ण युवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री राकेश धुमाळ यांनी व खारगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री प्रफुल्ल वालेकर यांनी केले. नंतर श्री राधाकृष्ण मूर्तींना खारगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय श्री दत्तात्रेय जी काळे, स्वामी विवेकानंद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख श्री रुळेकर साहेब, व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गोसावी यांचे हस्ते पुष्प हार अर्पण करून त्याच प्रमाणे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे मंडळाच्या वतीने शाळ,श्रीफळ व छोटे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.रुळेकर साहेबांनी एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी च्या सामजिक उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती देऊन मार्गदर्शन केले.
रक्तदान करण्याअगोदर आयोजकांनी व डॉक्टरांनी रक्तदानाचे फायदे ग्रामस्थांना समजावून सांगितले
त्या नंतर रक्तदान चे आयोजन श्री राधा कृष्णा मंदिरातील प्रसन्न वातावरणात सुरुवात केली.रक्तदान करण्यासाठी पुरुषानं सोबत गावातील महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती
रक्तदानसाठी आर के युवा व ग्रामस्थ मंडळाने चहा व बिस्किटाची व शुभम वालेकर ने फळ आहार सफरचंद व केळी दिली.
.श्री राधाकृष्ण युवा मंडळ आणि श्री स्वामी विवेकानंद संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभून एकूण जवळ जवळ ३८/४० जणांनी रक्तदान केले.
रक्तदान केल्यानंतर निसर्गाची काळजी व समाज बांधिलकी मानून प्रत्येक रक्तदान करण्याऱ्या व्यक्तीस एक फुलाचे रोपटे भेट दिली.
आणि मुख्य म्हणजे गावातील युवा रोशन घोसाळकर याने आता पर्यंत दहा वेळा रक्तदान केले आहे याची दखल ग्रामस्थांनी घेतली.
रक्तदान आहे खूप जरुरी,
त्याने येत नाही कमजोरी.
रक्त दान हेच
जीवन दान आहे
हे आता रोहेकरांचा मनात रचले आहे.