बारामती हादरले! लहान बाळाचा कान तोडलेले मुंडके, धड रस्त्यावर आढळले


बारामती: लहान बाळाचा खून करून त्याचे मानेपासून खालील धड नसलेले व उजव्या बाजूचा कान तोडलेले मुंडके आढळून आल्याने बारामतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 3 जानेवारी रोजी सूर्यनगरी कॉम्पलेक्स समोर मूरमाच्या रस्त्यावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीतील सूर्यनगरी येथील गणराज कॉम्पलेक्स समोरून पुर्वकडे जाणाऱ्या मुरुमाच्या कच्च्या रस्त्यावर अज्ञात आरोपीने अनोळखी लहान बाळाचा खून करून त्याचे मानेपासून खालील धड नसलेले व उजव्या बाजूचा कान तोडलेले मुंडके आढळून आले. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिल ओमासे (वय -५३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बारामती पोलिसांनी अज्ञाताविरोधात भा.द.वि कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »