ऊसतोड कामगारांची दिवाळी; पवार-मुंडेंनी तोडगा काढला आणि संघर्ष टळला… ऊसतोड कामगारांना ३४ टक्के दरवाढ..


ऊसतोडणी मजुरांना ऊस तोडणीच्या मजुरीत ३४ टक्के वाढ आणि मुकादमाच्या दलालीत (कमिशन) एक टक्क्यांनी वाढ करण्यात आली. साखर आयुक्तालयात झालेल्या बैठकीत हा ऊसतोडणी मजूर आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादाने पुढील तीन वर्षांसाठी हा निर्णय घेतला.

Advertisement

जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगारांनी ऊसतोडणीच्या दरात ४० टक्के वाढीची मागणी केली होती. तर कारखानदार २९ टक्के दरवाढीवर आडून बसले होते. त्यात समन्वय साधून ३४ टक्के दरवाढ देण्यात आली. ऊसतोड कामगारांची मजुरी प्रति टन २७४ रुपयांवरून ३६७ रुपयांवर जाणार आहे. तर मुकादमांना १ टक्का वाढीव कमिशन मिळणार आहे, मुकादमांना या पूर्वी १९ टक्के कमिशन होते, ते आता २० टक्के होणार आहे. पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादाने या हंगामापासून तीन वर्षांसाठी असणार आहे.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे काम अपेक्षित गतीने पुढे जात नाहीत. त्याबद्दल मी असमाधानी असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या, त्या विषयी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बैठकीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूचे अध्यक्ष शरद पवार, ऊसतोडणी मजुरांच्या नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, सुरेश धस आदी उपस्थित होते…

-Neha pardeshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »