“बारामतीचं ‘कृषिक 2024’; शेतीला नवीन दिशा देणारे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन


अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्र, (KVK) यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी कृषिक 2024 या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे…18 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 (सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) कृषिक 2024 आयोजित करण्यात आले आहे. 170 एकरवर या कृषिकचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, प्रिसिसीअन अॅग्रीकल्चरल, व्हर्टिकल फार्मिंग, ग्रामीण शेतकरी, रोबोटचा कृषी क्षेत्रात वापर, दुग्ध आणि फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस, दूध आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मिलेट दालन असं अनेक उपक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे.

या वर्षी काही नवीन बदल करण्यात आले आहेत,जवळपास 200 पेक्षा जास्त प्रात्यक्षिक पाहण्यास मिळतील.
भाजीपाला असो वा कडधान्य सर्व प्रकारचे पीक पाहण्यास मिळतील. Microsoft सारख्या कंपनी बरोबर करार करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीमध्ये कसा उत्पादन वाढवता येईल या विषयाची प्रात्याक्षिक देखील पाहायला मिळणार आहेत. जवळपास 19 देशांचे तंत्रज्ञान सहभागी झालेले आहेत..

 

 

पशु ज्यामध्ये animal exhibition च्या माध्यमातून animal show सादर करण्यात येणार आहे.
त्याच बरोबर पशु प्रदर्शन चे देखील मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement


Animal show मध्ये संकरीत गायीची दूध उत्पादन क्षमता अजमावण्या करिता milk competition चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी आपन पाहू शकू.
कालवडी चा शो देखील आयोजित करण्यात येणार आहे ज्यामध्ये अनेक प्रकारच्या आनुवंशिक दृष्टीने उत्तम असलेल्या कालवडी दाखवण्यात येणार आहेत . त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती, डॉग शो देखील आयोजित करण्यात येणार आहे.

या कृषी प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांतून लाखो शेतकरी भेट देण्यासाठी येत असतात. त्यासाठी 170 एकरांवरील पीक प्रात्यक्षिक पाहतानाचा शेतकरी फ्लो, त्याचबरोबर पार्किंग व्यवस्था, येणाऱ्या शेतकऱ्यांची भोजन, चहा नाश्ता तसेच लांबून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रदर्शनामध्ये प्रत्येक प्लॉटवर त्या पिकाचे माहितीचे बोर्ड, तसेच त्या ठिकाणी माहिती देणारी व्यक्ती असणार आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध उपक्रम पाहता येतील.

त्वरित आपली नोंदणी पुढे दिलेल्या लिंक वरून करून घ्यावी.

https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik

‘Krushik 2024’ exhibition launched to promote modern agriculture in Maharashtra | Webvibemedia – Vishal Patil

-Neha Pardeshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »