मनोज जरांगेंची तब्येत आणखी खालावली, आमरण उपोषणाचा सहावा दिवस… मनोज जरागेंनी उपचार घ्यावेत, त्यांना अडचण काय? मुंबई हायकोर्टाचा सवाल


मनोज जरांगे पाटील हे १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांनी अन्न-पाणी सोडलं आहे. उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे. त्यांची प्रकृती बिघडली आहे. याप्रकरणी सरकार २० फेब्रुवारीला एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यादिवशी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Neha Pardeshi | Updated on: Feb 15, 2024 | 9:30 PM

आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय नाजूक असल्याची
चिंताजनक बाब आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस असल्याने त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. अशक्तपणामुळे जरांगे पाटलांना भोवळ आली. अन्न, पाण्याच्या त्याग आणि औषधोपचारालाही मनाई करणाऱ्या मनोज जरांगे यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यानंतर महंतांनी आग्रहाने जरांगेंनी पाणी पाजलं. पण, जरांगेची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पाणीही घोटवत नाही. त्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत. जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली आहे.
मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांकडून करण्यात येत आहे. ‘पाणी घ्या’ म्हणत घोषणाबाजी सुरु आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज जरांगे यांच्या उपोषस्थळी दाखल झाले आहेत. तब्येत खालावली असल्याने आज मनोज जरांगे यांना पाणी पिण्यासाठी जोरदार आग्रह होत आहे. त्यांना अशक्तपणामुळे ग्लानी आली. यावेळी सहकारी आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आग्रह करत जरांगेंना पाणी पाजलं. मनोज जरांगे यांनी एक ग्लास पाणी घेतलं. आंदोलक, सहकारी मित्र आणि महंत शिवाजी महाराज यांच्या आग्रहानंतर त्यांनी पाणी घेतलं.
याप्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. मनोज जरांगे यांना उपचार घेण्यास अडचण काय आहे? सलाईल लावणे म्हणजे उपचार नव्हेत. त्यांनी उपचार घ्यावेत अशी सूचना मुंबई हायकोर्टाने दिल्या आहेत. मनोज जरांगेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, जरांगेच्या उपचारासाठी दोन डॉक्टर तिथे आहेत. बुधवारी जरांगेंनी दोन सलाईनच्या माध्यमातून फ्लुईड घेतले. यावर हायकोर्टाने म्हटलं की, डॉक्टर त्याठिकाणी असणे म्हणजे उपचार घेणे असा होत नाही. त्यांना औषधोपचार घ्यायला सांगा. मात्र रक्ततपासणी ही त्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही.

Advertisement

जरांगे डॉक्टरांच्या उपचाराला सहकार्य करत नाहीत. फ्लुईड व्यतिरीक्त ते कुठलेही औषधोपचार घेत नाहीत, अशी बाजू महाधिवक्तांनी कोर्टात मांडली. दुसरीकडे, अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेच्या आदोलनाचा परिणाम म्हणून बुधवारी अनेक ठिकाणी बसेसची तोडफोड झाल्याचे कोर्टात सांगितलं. तसेच तोडफोडीचे फोटो त्यांच्याकडून कोर्टात सादर करण्यात आले.तुम्ही भारताचे नागरीक आहात म्हणून राज्य सरकार तुमची काळजी घेतीये, त्याला तुमचा विरोध का, अशी विचारणा कोर्टाने मनोज जरांगे यांना केलीये. जे काही औषधोपचार यांची गरज आहे ते आम्ही घेत आहोत. डॉक्टर तिथे आहेत. पण कधी कधी ते (जरांगे) बोलण्याच्या मनस्थितीत नसतात, असं जरांगेच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »