लक्षद्वीप Vs मालदिव्ह… Boycott Maldives का होतेय ट्रेंड? पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर भारतीयांनी का रद्द केला मालदीव दौरा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी तेथील सुंदर बेटाची भ्रमंती केली. तेथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आहे तेव्हापासून मालदीवमध्ये मोठा गदारोळ माजला आहे. मालदीवच्या काही सर्वोच्च मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काही अपमानास्पद टीका केल्या आहेत.

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर केली टीका…

मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला विभागाच्या उपमंत्री मरियम शिउन (Mariyam Shiuna) यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोंवर कमेट्स करीत त्यांना ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे संबोधले आहे. हे पोस्ट डिलीट करण्यात आली असून त्याचे स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल होत आहे.
झहीद रम्मेझ यांनी कमेंट करत लिहिले
‘The move is great. However, the idea of competing with us is delusional. How can they provide the service we offer? How can they be so clean? The permanent smell in the rooms will be the biggest downfall.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जानेवारी रोजी लक्षद्वीपला दिलेल्या भेटीचे काही फोटो शेअर केले होते. मालदीवबाबत एकाही शब्दाचा उल्लेख न करता, पंतप्रधानांनी लक्षद्वीपच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “अलीकडेच मला लक्षद्वीपच्या लोकांसह राहण्याची संधी मिळाली. मी अजूनही येथील बेटांचे अविश्वसनीय सौंदर्य पाहून थक्क आहे. मला आगत्ती, बंगाराम व कवरत्ती येथील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी बेटावरील लोकांनी आदरातिथ्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. लक्षद्वीपच्या हवाई दृश्यांसंह येथील सोंदर्याची झलक दाखवणारे फोटो येथे आहेत.”

Advertisement

भारतीय पर्यटकांनी रद्द केला मालदीव दौरा…

विशेष म्हणजे मालदीव हे बेट हे मुख्यत्वे पर्यटनावर अवलंबून आहे. भारताला निसर्गसौंदर्य लाभले असूनही मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक या देशाला भेट देतात. पण, पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर बॉलीवूड स्टार्ससह अनेक भारतीय पर्यटकांनी मालदीवचा दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदींचा अपमान केल्याबद्दल अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. सध्या सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव ट्रेंड (#BoycottMaldives) होत आहे.

एक्स ट्विटरवर एकाने स्क्रीनशॉट शेअर करीत लिहिले, “माफ करा मालदीव, माझ्याकडे माझे स्वतःचे लक्षद्वीप आहे. मी आत्मनिर्भर आहे.” दुसऱ्याने कमेंट करीत लिहिले, “१ फेब्रुवारी २०२४ पासून पाम्स रिट्रीट (Palms Retreat) मालदीव येथे पाच लाख रुपायचं तीन आठवड्यांचं बुकिंग केलं होतं; पण त्यांचे मंत्री वर्णद्वेषी झाल्यानंतर लगेचच ते रद्द केलं.”

दरम्यान, “मालदीवमधून भारतानं आपलं सैन्य मागे घ्यावं”, अशी विनंती मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयानं केली आहे. त्यामुळे भारत आणि मालदीवमधील संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आता पंतप्रधान मोदींविरुद्ध टीका केल्याने संबंध आणखी बिघडतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

– Neha Pardeshi.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »