वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ; यंदा भाव 70 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात!
वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला सोन्या-चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम सोने 46 रुपयांनी महागले आहे आणि 63,302 रुपयांवर पोहोचले आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 47,477 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
चांदीच्या दरातही आज वाढ दिसून येत आहे. चांदी 73,624 रुपये किलोवर पोहोचली आहे. पूर्वी ती 73,395 रुपये होती. 2023 च्या सुरुवातीला सोन्याचा भाव 54,867 रुपये प्रति ग्रॅम होता, जो 31 डिसेंबर रोजी 63,246 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला. म्हणजेच 2023 मध्ये त्याची किंमत 8,379 रुपयांनी वाढली. त्याचवेळी चांदीचा भावही 68,092 रुपयांवरून 73,395 रुपये प्रतिकिलो झाला.
तज्ज्ञांच्या मते 2024 मध्येही सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सोन्याचा भाव 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. चांदीबद्दल बोलायचे झाले तर ती 85 हजार रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते.